मटण दरवाढीचा तिढा वाढलेला असतानाच कोल्हापुरात बकरी चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ  लागली आहे. चार दिवसांपूर्वी विचारेमाळ परिसरातून आठ शेळ्यांची चोरी झाल्याचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. शनिवारी जवाहरनगर येथे राहणारे सुदाम पोळ यांच्या शेळ्या अज्ञातांनी चोरून नेल्या.

पोळ यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलीकडेच असाच एक गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. एका वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून चोरटय़ांनी मोटारीमधून सात बकऱ्या चोरल्याचा प्रकार शाहूपुरीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी पांडुरंग कुंभार (वय ३६ ) या चोरटय़ाला ताब्यात घेतले होते. कोल्हापुरात मटण दरवाढीचा तोडगा अद्यापही समाधानकारक मिटलेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक भागात मटण दर कमी व्हावेत यासाठी आंदोलने सुरू आहेत.