कोल्हापूर : दुर्गापर्वास सुरुवात होत असताना करवीर निवासिनीच्या कोल्हापुरात पूर्वसंध्येला झालेल्या महिला गोलमेज परिषदेत महाराष्ट्रासह देशातील सर्वच मंदिरांमध्ये सरकारी वेतनावर महिला पुजारी नेमावेत तसेच महिलांना स्वतंत्र देण्यात येणाऱ्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असा ठराव करण्यात आला.

आम्ही भारतीय महिला मंचच्यावतीने स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी, महामातांच्या विचारांचा वेध घेण्यासाठी, मानवतावादी, समतावादी, स्त्रीवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महिलांनी, फक्त महिलांचा सहभाग असलेल्या महिला प्रतिनिधींच्या गोलमेज परिषद आयोजित केली होती. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या जोरावर आज महिला पुढे आल्या विकसित झाल्या, अनेक उंच शिखरे तिने प्रादाकांत केले. असे असले तरी आज तिची जात, धर्म, लिंगभेद आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे जी घुसमट होत आहे ती थांबवण्यासाठी महिलांची सक्षम चळवळ उभे करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परिषदेच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी शनिवारी केले.

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

हेही वाचा >>> “सत्ताधारी पक्षाचा असलो तरी आमदार म्हणून…”, किशोर जोरगेवार यांची खंत

 संविधानाची प्रास्ताविकेचे वाचून विजया कांबळे, अनिता काळे यांच्या हस्ते गोलमेज परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्षा डॉ. निकिता चांडक, सूत्रसंचालन नीती उराडे, आभार अनिता गायकवाड यांनी मानले. परिषदेला निमंत्रक अनिता काळे, प्रा. डॉ. स्मिता गिरी, प्रा. डॉ. शोभा चाळके, रूपाताई वायदंडे, निती उराडे, विमल पोखर्णीकर, डॉ. सुजाता नामे, अनिता गायकवाड,मालती कांबळे, हिराताई देशमुख, वृषाली कवठेकर, नुतन गोंधळी, लक्ष्मी कांबळे, कमल कवठेकर, संगिता लोंढे, पद्मा कांबळे, वैशाली लोंढे, वर्षा सामंत, जयश्री नलवडे, आयेशा काझी, वर्षा कांबळे, वासंती मिसाळ, पूनम मेधावी, प्रा. प्रेरणा कवठेकर, श्रीदेवी कांबळे यांच्यासह विविध भागातील महिला उपस्थित होत्या.

 अन्य ठराव याप्रमाणे

 सरकारने मुलींकरिता प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत करावे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्याकरता स्वतंत्र व सक्षम महिला पोलीस यंत्रणा उभी करावी. महिलांचे ढासळते आरोग्य पहाता ते सुधारण्यासाठी स्वतंत्र व उच्च दर्जाची आरोग्य यंत्रणा उभी करावी. महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी व विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे.