आपल्या विरोधात बेबंद आरोप करणारे ताराराणीचे कारभारी सुनील कदम यांच्या विरोधात एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कदम यांच्या मागील बोलविता धनी हे आमदार महादेवराव महाडिक असून त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत मुश्रीफ यांनी आगामी वादळी राजकारणाचे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाचा गरवापर करुन शहरातील महापालिकेच्या मालकीची एक जागा लाटल्याचा आरोप सुनिल कदम यांनी जाहीर सभेत केला होता. याचा समाचार आमदार मुश्रीफ यांनी घेतला. महापालिका जागा आपण लाटली असल्याची सुनिल कदम यांनी केलेली टीका चुकीची असून ही जागा आपण घोरपडे नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगीतले. तसेच या खरेदी व्यवहाराची चौकशी करावी यासाठी एक समिती नेमावी. या समितीचे अध्यक्ष महादेवराव महाडिक यांना करावे, असा उपरोधिक टोलाही मुश्रीफ यांनी महाडिकांना लगावला. गोकुळमधील कारभाराची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत, ही कागदपत्रे आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देणार असून ते काय कारवाई करतात हे पाहणार आहोत, असे नमूद करीत त्यांनी खडसे यांना गोकुळमधील गरकारभाराच्या चौकशीचे आव्हान दिले.

आरपीआयच्या रा.सू.गवई गटाच्या वतीने महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पािठबा जाहिर केला असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
दावा दाखल काम प्रक्रियेत यापूर्वी आपणावर टीका करणाऱ्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर, आमदार राजेश क्षिरसागर, कोलते यांच्या विरोधातही अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहेत. याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते दाखल होतील असे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यावरही दावा दाखल करणार होतो मात्र तो राहून गेला असेही मुश्रीफ यांनी न विसरता सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif to file defamation case against sunil kadam
First published on: 25-10-2015 at 01:02 IST