कोल्हापूर : ज्येष्ठ ऐतिहासिक शस्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव ( वय ७३) यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. त्यांनी राज्य तसेच राज्याबाहेर फिरून ऐतिहासिक शस्त्रांचा विपुल संग्रह केला आहे. शिवकालीन शस्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

जाधव हे मूळचे जयसिंगपूरचे. जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण जाधव हे त्यांचे वडील. त्यांना महाविद्यालयीन दशेपासूनच शस्त्र संग्रहाचा छंद लागला होता. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठी भ्रमंती केली होती. पुढे १९८० सालापासून त्यांच्यातील शस्त्रास्त्र संग्रहाची चुणूक दिसून आली. ते पुणे येथे राहत असताना त्यांना मिळालेली कट्यार त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवली असता त्यांनी ती शिवकाळातील असल्याचे  सांगितले होते. या एका शस्त्राने त्यांच्या या संग्रहवृत्तीने मोठा गती घेतली. पुढे ते मुंबईत स्थायिक झाल्यावर त्यांनी राज्यभर तसेच राज्याबाहेर फिरून मोठ्या प्रमाणात ही ऐतिहासिक शस्त्रे गोळा केली. आज त्यांच्या संग्रहात शिवकाळातील तलवारी, भाले, गुप्त्या, कट्यारी व सुरा, खंजीर, जंबिया, बिचवा, बर्ची, वाघनखे अशी हत्यारे आहेत. जुने बाण, तोफेचे गोळे आहेत. या सर्व संग्रहाचे त्यांनी प्रदर्शने भरवून या ऐतिहासिक वारशाबाबत समाजप्रबोधनाचे कामही केले.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे आशीर्वाद त्यांना लाभले होते. त्यांची या विषयावरील निष्ठा पाहून अनेकांनी स्वत:कडील शस्त्रे त्यांना भेट म्हणून दिली. संग्रह वाढवतानाच या शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व, विविध संदर्भग्रंथांचे वाचन करून त्यांनी या विषयात सखोल अभ्यास केला होता.