कोल्हापूर : लोकप्रतिनिधी बनण्याचा मार्ग जिल्हा परिषदेतून जातो असे विधान करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नव्या पिढीच्या नेतृत्वाला राजकारणात पुढे येण्याची संधी असल्याचे अधोरेखित करून त्यांच्या आशा वाढवल्या आहेत. जिल्ह्याचा लोकसभेचा आखाडा पाहता येथेही जिल्हा परिषदेत काम केलेल्यांची गर्दी दाटल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा इतिहास पाहता अनेकांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेतून बहरल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील दोन्ही मतदारसंघातील उमेदवार कोण असेल याची उत्सुकता वाढली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाचे उद्घाटन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द कशी वाढीस लागते यावर प्रकाशझोत टाकला.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

हेही वाचा – पुणे काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्याचा प्रयोग फसला

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जाते. आजवरचे अनेक आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जिल्हा परिषदेतून पुढे आलेले नेतृत्व आहे. जिल्हा परिषद ही नेते घडवणारी जणू एक शाळा आहे, असे म्हणत मुश्रीफ यांनी राजकारणात वरची यत्ता गाठायची असेल तर जिल्हा परिषदेत असतानाच राजकारणाचा पाया मजबूत केला पाहिजे असे सुतोवाच केले.

जिल्हा परिषदेतून झेप

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला मान्यवरांचे नेतृत्व मिळाल्याचा उज्वल इतिहास आहे. बाळासाहेब माने, उदयसिंगराव गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे, सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी, संजयसिंह घाटगे, नरसिंग पाटील, भरमु पाटील, नामदेवराव भोईटे, प्रकाश आबिटकर अशा कैकांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेच्या प्रवासापासूनच खुलत गेली. पुढे यांना आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळाली.

लोकसभा निवडणुकीत आताही जिल्हा परिषदेत काम केलेल्यांची नावे ठळकपणे पुढे येताना दिसत आहे. कोल्हापूरचे दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हेही जिल्हा परिषदेतूनच पुढे आले आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे दोघे उमेदवार असणार हेही निश्चित आहे. राजू शेट्टी हेही लढतीत असणार हेही निश्चित आहे. त्यांच्या बरोबरीनेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, राहुल आवाडे या माजी सदस्यांची नावेही चर्चेत आहे. किंबहुना हातकणंगले मधून जिल्हा परिषदेत नेतृत्व केलेल्यासच संसदेत जाण्याची संधी मिळणार असे दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या राजकारणाचा प्रवास पुढेही सुरू राहणार हे उघड आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तर ही यादी खूपच मोठी आहे.

हेही वाचा – जातीच्या आधारावर मतदान होणारा मतदारसंघ, महायुतीत प्रफुल्ल पटेल की भाजप ?

सामान्यांना संधी किती?

तथापि, पूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण याच्या हाताळणीमध्ये कमालीचा मोठा फरक पडला असल्याने सामान्य कार्यकर्त्याला खरेच आमदार, खासदारमंत्री होणे आताच्या काळात शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूर्वीच्या काळी कार्यकर्त्यांचे कर्तृत्व ओळखून त्यांना संधी देणारे प्रगल्भ नेतृत्व असल्याने उमद्या तरुण नेतृत्वास ते जिल्हा परिषदेत संधी देत. पण पुढेही विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असत असा इतिहास आहे. हल्ली बडे नेते आधी आपल्या घरातील तरुण पिढीचा उमेदवारीसाठी विचार करतात. ते शक्य नसेल तरच मग कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार केला जातो. अशीच भावना जिल्हा परिषदेत गेली तीस वर्षे सदस्य राहिलेले ज्येष्ठ सदस्य अरुणराव इंगवले यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेत काम केले तरी लोकसभा, विधानसभेमध्ये संधी मिळायची असेल तर चांगला गॉडफादर पाठीशी असला पाहिजे. अलीकडे आपल्याच घरातील नेतृत्व पुढे आणण्याकडे कल दिसतो. इतकेच काय पण जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीवर खासदार, आमदार, मंत्री यांचा डोळा असल्याने तो लाटला जातो, अशी खंत व्यक्त केली. नव्या दमाच्या नेतृत्वास अजूनही विधानसभा, लोकसभा सर करण्याची संधी उपलब्ध असल्याचे वाटते. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी प्रामाणिकपणे काम केले तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढे नेतृत्व करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे. सध्या केवळ घराणेशाही असून चालत नाही. किंबहुना घराणेशाहीचा वारसा चालवणाऱ्यांना लोकसंपर्क ठेवणे, लोकांची कामे करणे अपरिहार्य बनले आहे. उमेदवार सक्षम नसेल तर लोक स्वीकारत नाही असा इतिहास आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे.