कोल्हापूर : वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याच्या परंपरागत प्रथेला छेद देत कोल्हापुरातील एका शासकीय अधिकाऱ्याने विधवांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी केला. या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे. सण समारंभ, उत्सव, विवाह सोहळा असेल तर विधवांना गौण स्थान दिले जाते. हळदी- कुंकू, मान- सन्मान यापासून त्यांना दूर सारले जाते . अलीकडे समाजातील अनिष्ट रूढी परंपरांचा पगडा कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करून रूढी परंपरांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनींचे पूजन करून त्यांना जेवण देत नव्या वास्तूत पंगत बसवण्याची परंपरा या भागात गेली अनेक वर्ष सुरू आहे. तिला छेद कसबा बावडा येथील वितरण अधिकारी दीपक वावरे यांनी दिला.

हेही वाचा : ‘बिद्री’तील विजयाचा राजकीय संबंधावर परिणाम नाही – हसन मुश्रीफ

Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
Rajwardhan Kadambande on Shahu Maharaj
“मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरकरांना माझे…”, राजवर्धन कदमबांडे काय म्हणाले?
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा

त्यांच्या आई उमा वावरे यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. आईच्या स्वप्नातील घर साकारलेल्या वावरे यांनी घराचा गृहप्रवेश करण्याचे ठरवले. सुवासिनी भोजनाची प्रथा आहे, अशी माहिती त्यांना नातेवाईकांकडून मिळाली. मात्र, माझी आई जिवंत असती तर तिलाही यापासून दूरच राहावे लागले असते असा विचार वावरे यांच्या मनात आला. त्यांनी सुहासिनी ऐवजी विधवांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला. याला कुटुंबीयांनी पाठबळ दिले.

हेही वाचा : बिद्री कारखान्यातील विजयाने के. पी. पाटील यांची विधानसभेची पायाभरणी, चंद्रकांत पाटील यांना धक्का

डोळ्यात अश्रू तरळले

मुलाबाळांची जबाबदारी झेलत विधवा येणारा दिवस जगत असतात मात्र समाजही या महिलांना मानसन्मान देण्यात कुठेतरी कमी पडतो अशी खंत प्रत्येक विधवा महिलेला वाटते, मात्र वावरे कुटुंबीयांनी गृहप्रवेशाच्या वेळी दिलेल्या सन्मानामुळे उपस्थित असलेल्या अनेक विधवा महिलांना अश्रू अनावर झाले.