कोल्हापूर : कर्नाटक राज्यात नंदिनी शिखर संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान दिले जाते. महाराष्ट्र शासन असे अनुदान महानंदा शिखर संघाच्या माध्यमातून देण्याची योजना असली तरी हा संघ सध्या मोडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पर्याय म्हणून गोकुळ दूध संघ हा ब्रॅण्ड धरून दूध अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे मांडली. गोकुळ दूध संघाने १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने कलश पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमूल – नंदीनीशी स्पर्धा

आज संघाचे संस्थापक आनंदराव पाटील यांचा स्मृतिदिन असताना गोकुळने १८ लाख ४२ हजार लिटर दूध संकलन केले. ही गोकुळसाठी अभिमानाची बाब आहे, असा उल्लेख करून मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ समोर असणारी आव्हाने व संधी यांचा उहापोह केला. ते म्हणाले, गोकुळ समोर गुजरातचा अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी या दूध संघांचे आव्हान आहे. मुंबईच्या बाजारपेठेत स्थान उंचावण्यासाठी गोकुळच्या फॅटमध्ये वाढ करावी, अशी सूचना दूध वितरकांनी केली असल्याने त्यानुसार नियोजन केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

bachhu kadu criticized police action
‘पोलिसच भाजपाचे कार्यकर्ते, आता आम्ही विष प्यावे का?’ बच्चू कडू यांचा उद्विग्न सवाल
indira gandhi tried to end democracy says devendra fadnavis
इंदिरा गांधींकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांची टीका
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?

हेही वाचा : आदमापुरातील संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला विरोध; बुधवारी धरणे आंदोलन

पाचशे कोटीचे कर्ज

गोकुळच्या म्हैस दुधामध्ये वाढ व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५०० कोटी रुपये कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून दूध संघाचे संचालक , अधिकारी, शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात म्हशी खरेदी केल्याने तीन लाख लिटर दूध वाढले आहे. अगदी उत्तर भारतात जाऊन म्हैस खरेदी करून शासनाच्या पशुधन अनुदान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा : कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या प्रस्तावित विकास आराखड्यास व्यापाऱ्यांचा विरोध

कोल्हापुरात दूध थांबवा

गेले महिनाभर गोकुळचे सरासरी दूध संकलन १७ लाख ६५ हजार लिटर होत आहे. पण आपल्याला २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. याकरिता सर्व सुपरवायझरने लक्ष्यांक पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाणारे दोन लाख लिटर दूध जिल्ह्यात थांबावे किंबहुना ते गोकुळकडे वळवावे याकडे सर्वांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के .पी. पाटील यांची भाषणे झाली. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सत्ता आल्यापासून गोकुळचे दूध संकलन ५ लाख लिटरने कसे वाढले याचा प्रवास विशद केला.