कोल्हापुरातून राधानगरी- दाजीपूरची जंगल सफारीची सोय

वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या या बसचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्य येथे सोमवारपासून जंगल सफारीची सोय करण्यात आली आहे.

राधानगरी— दाजीपूर येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखडय़ात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास १७ प्रवाशी क्षमतेची बस घेतली आहे. ही बस मंगळवार सोडून आठवडय़ातून सहा दिवस या दोन्ही अभयारण्याचे दर्शन घडवेल.

यामध्ये एका पर्यटकाला ३०० रुपये शुल्क असून त्यात एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी विभागीय वन अधिकारी(वन्यजीव) कार्यालय, रमणमळा (दूरध्वनी – ०२३१-२६६९७३०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन आधिकारी विशाल माळी यांनी केले.

अभयारण्य पर्यटनाला चालना

वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या या बसचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. ‘जंगल बस सफारी’ उपक्रमामुळे राधानगरी अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सोमवारी बसमधून बालकल्याण संकुल येथील १५ अनाथ मुलांना मोफत जंगल सफारीचा लाभ देण्यात आला. खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, समाधान चव्हाण उपस्थित होते.

काय पाहाल ?

राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी धरण बोटिंग, दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र, गवा सफारी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jungle safari facility from kolhapur to radhanagari to dajipur wildlife sanctuary zws

ताज्या बातम्या