कोल्हापूर : गेली काही वर्ष हवामानातील बदल आणि दूषित हवा यामुळे करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव व्यवस्थित पार होत नव्हता. यावर्षी मात्र तो सुरळीतपणे झालाच पण आज अखेरच्या दिवशी किरणोत्सवाची तीव्रता अधिक असल्याचेही दिसून आल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. आज उतरता कालखंडामधला किरणोत्सव योग्य पद्धतीने झाला. वातावरण स्वच्छ हवेतील धुलीकण कमी , अपेक्षित आद्रता प्रखर सूर्य किरणे हे आजच्या किरणोत्सवाचं वैशिष्ट्य होते.
हेही वाचा >>> जित्राबांचे आक्रित! शेतकऱ्यांना थंडा प्रतिसाद; जनावरे चौकात आणताच इचलकरंजीतील ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची कोंडी फुटली
संध्याकाळी मावळतीची सूर्यकिरणे सहा वाजून तेरा मिनिटांनी आली. सहा वाजून १४ मिनिटांनी चरण स्पर्श केला. ६ .१५ ते ६.१६ यादरम्यान गुडघ्यापासून कमरेपर्यंत वर सरकली. ६ वाजून१७ मिनिटांनी किरणे खांद्यापर्यंत आली. आणि ६.१७ ते ६.१८ या दरम्यान चेहऱ्यावरती येवून येऊन देवीच्या डावीकडे लुप्त झाले.
आजच्या किरणांचे एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल जी १२ वर्षांमध्ये महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये तीव्रता मिळाली नव्हती. तेवढी तीव्रता आज पाहायला मिळाली. म्हणजे ज्यावेळेला देवीची किरणे गुडघ्यापर्यंत गेले. त्यावेळेला सूर्यकिरणांची तीव्रता ९६ ते ११० लक्ष या दरम्यान होते. अशा पद्धतीने आजचा पाच दिवसाच्या किरणोत्सवातला चौथा दिवस योग्य पद्धतीने अपेक्षेप्रमाणे झाला. किरणोत्सव भाविकांना व्यवस्थित पाहता यावा यासाठी मंदिर परिसरात मोठ्या स्क्रीन लावल्या होत्या. त्यासमोर बसून भाविकांनी हा सोहळा पाहिला.