कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शंभर कोटीची रस्ते कामे रखडल्यानंतर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने आंदोलन छेडल्यानंतर आता कोल्हापूर महापालिकेला जाग आली आहे. शहरातील केवळ पाच प्रमुख रस्ते ३० मे पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश बुधवारी ठेकेदारास देण्यात आले आहेत.

शहरातील १६ मुख्य रस्ते करणे बाबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) शासन निधीतून १०० कोटी निधी मधून रस्ते करण्यास मान्यता झालेली असून त्या अनुषंगाने सदर कामाची वर्क ऑर्डर ठेकेदार मे. एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर यांचे नावे मंजूर झालेली आहे.

illegal hoardings
कोल्हापुरातील अनधिकृत होर्डिंग्जची संख्या एका रात्रीत वाढली; १७ होर्डिंग हटवले
Jata elimination of three women
कोल्हापुरात एकाच वेळी तीन महिलांचे जटा निर्मूलन; आणखी एक पुरोगामी पाऊल
Pratap Hogade, smart meter,
स्मार्ट मीटर्सचा स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; प्रताप होगाडे यांचा आरोप
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
journalists protest for rajekhan jamadar arrest
कोल्हापूर शिवसेनाप्रमुख राजेखान जमादार अटक कारवाईसाठी पत्रकारांची निदर्शने
Kolhapur Municipal Officer, Kolhapur Municipal Officer Suspended, Unauthorized Tree Felling, Unauthorized Tree Felling in Padmaraje Park, Kolhapur news, Kolhapur municipalitya, marathi news,
कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले
chandrababu naidu marathi news, chandrababu naidu latest marathi news
कोल्हापूर: चंद्राबाबू नायडू उद्या महालक्ष्मी, साईबाबाच्या चरणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा : स्मार्ट मीटर्सचा स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; प्रताप होगाडे यांचा आरोप

यंत्रणे अभावी कामे रखडली

सदरची वर्क ऑर्डर १४.१२.२०२३ रोजी ठेकेदारास लागू करण्या आलेली आहे. या १६ पैकी ५ रस्त्याची कामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्याबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी ठेकेदाराला आदेश दिले होते. तथापी ठेकेदाराकडे उपलब्ध असलेले यांत्रिक बळ, मनुष्यबळ तसेच मटेरिअल पाहता त्याला दिलेल्या कालावधीमध्ये तो कामे पूर्ण करु शकलेला नाही. त्यामुळे संबधित ठेकेदाराला कोल्हापूर महानगरपालिकेकडून कामाची प्रगती वाढविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

या कामांना गती

यानंतर संबधित ठेकेदाराने दि. ११.०५.२०२४ रोजी पासून योग्य ते मनुष्यबळ व यांत्रिक बळ आणून कामासाठी लागणारे मटेरिअल उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने काम सुरु केले आहे. या ५ रस्त्यांपैकी निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड या ५९८ मी. लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण काम पूर्ण झाले आहे. तसेच सद्यस्थितीत कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक या ४०० मी. रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण करून डांबरीकरण काम प्रगतीपथावर आहे. खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक या रस्त्यांपैकी भाग निहाय रस्त्याचे खडीकरण केलेले आहे.

हेही वाचा : कोल्हापूर: चंद्राबाबू नायडू उद्या महालक्ष्मी, साईबाबाच्या चरणी

माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्वजित हॉटेल लांबी १५०० मी. या रस्त्याचे युटीलिटी शिफ्टींग तसेच खडीकरण काम सुरू आहे. शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता दसरा चौक ते इंदिरा सागर हॉटेल प्रथम प्राधान्याने करण्याचे नियोजन संबधित ठेकेदारास देण्यात आले आहे. या ५ रस्त्याची कामे ३० मे पुर्वी खडीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला निर्देशित करण्यात आलेले आहे.

आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा

कामाची मुदत ही १८ महिन्यांची आहे म्हणजे एकूण काम पूर्ण होण्यास कोल्हापूरकरांना आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करणे भाग आहे. दि.१३.०५.२०२५ रोजी कामे पूर्ण होणार आहेत. या कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून सदर वर्क ऑर्डरमध्ये नमुद संपूर्ण १६ रस्त्यांची कामे पूर्ण करणे संबधित ठेकेदाराला बंधनकारक राहणार आहे. अन्यथा संबधित ठेकेदारावर टेंडर शर्तीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.