कोल्हापूर : महावितरण कंपनीचे जाळे मोठे, भक्कम आहे. त्यांनी पारदर्शक कारभार करून आणि क्षमतांचा पूर्ण वापर करून प्रामाणिक कारभार केला तर कोणत्याही खासगी कंपनीच्या स्पर्धेवर मात करता येणे शक्य आहे, असे मत महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी अदानी कंपनीच्या ज्सगीकरणाच्या निर्णयाविरोधात तीन दिवस संप करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर होगाडे म्हणाले, साडेतीन कोटी सर्वसामान्य ग्राहकांचा सहभाग असलेली महावितरण कंपनी टिकावी अशा सर्वाच्या भावना आहेत. दुर्दैवाने यामध्ये खासगीकरणाचा अडसर महावितरण समोर आहे. वास्तविक, वीज कायदा २००३ नुसार खासगीकरणाला परवाना देण्यात आला आहे. टाटा वीज कंपनीने तो मिळवला असल्याने रिलायन्सचे ग्राहक तिकडे वर्ग होताना दिसत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran can do competition with private companies opinion of pratap hogade zws
First published on: 07-01-2023 at 06:12 IST