कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांचे काल निधन झाल्यानंतर आज रक्षा विसर्जन करण्यात आले. रक्षाविसर्जन वेळी एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी म्हणून प्रयाग संगमावर वाहण्यात आली. उर्वरित रक्षा शेतामध्ये विसर्जित करण्यात आली. दरम्यान , आज पाटील कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रीघ लागली होती. कॉग्रेसच्या नेतृत्वाने यावेळी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा >>> पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर समयमर्यादा ठेवून कारवाई करा!

आमदार पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी आज सडोली खालसा गावी झाला. यानंतर शोकसभा झाली.  माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, बदलत्या काळात सत्तेबरोबर सर्व नेते इकडे तिकडे उड्या घेतात. राज्यघटना, विचारांवर विश्वास असलेले आमदार पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसशी निष्ठा सांभाळली होती.

हेही वाचा >>> कोल्हापूरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशा पाठवा; हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुलांचे सांत्वन करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले, विलासराव देशमुख यांना वाटेत थांबवून विकास कामे करून घेणारा एकमेव नेता म्हणून पाटील यांची ओळख होती. ऋतुराजला मी पुढे आणले त्याप्रमाणे राहुल – राजेश यांना पाठबळ असेल.  आमदार ऋतुराज पाटील, युवराज संभाजीराजे , काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राजू लाटकर, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपस्थित होते.