कोल्हापूर : कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश अग्रेषित होत आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून एकमेकांच्या नेत्यावर टीका होऊ लागली आहे. या अंतर्गत महायुतीकडून समाज माध्यमात अग्रेषित होणाऱ्या संदेशमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात चुकीचा संदेश अग्रेषित केला असल्याने त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली असल्याचे सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले. शाहू महाराज आणि त्यांच्या विचारसरणीला बदनाम करणारे हे संदेश आहेत. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे आमदार पाटील यांच्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

हेही वाचा – आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, नियमबाह्य पद्धतीने निविदा दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

हेही वाचा – रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश

दरम्यान, पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज यांचे स्थान अबाधित ठेवायचे असल्यास वैयक्तिक टीका टाळा, असे आवाहन केले आहे. तरीही हे संदेश पसरवले जात आहेत. मात्र काँग्रेसचा रोष पाहता अशा प्रकारचे संदेश हे प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे दिसत आहे.