कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गेल्या तीन वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी गतवर्षी (२०२१) केली असून वर्षभरात ५ हजार ६८५ गुन्हे दाखल झाले असताना ५ हजार ६७३ गुन्हे उघडकीस आणले. तब्बल ९९ टक्के गुन्हे उघडकीसचे प्रमाण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सन २०२१ मध्ये संघटीत गुन्हेगारी अंतर्गत करणाऱ्या इचलकरंजी येथील खंडेलवाल, शाम पुनिया, महेश दळवी, जर्मन, सुदर्शन, कोल्हापूरमधील आर.सी., भास्कर आदी ८ टोळय़ांवर कारवाई करून ६० पैकी ५०आरोपींना अटक केली. ८१ समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई केली. एकूण ३ हजार ६१३ गुन्हे उघड झाले असून ७ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ कोटीचे दागिने परत

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police detects crimes criminals ysh
First published on: 13-01-2022 at 02:39 IST