येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी २६ जून रोजी शाहू जयंती निमित्त समाज कार्य, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस, संस्थेस सन १९८४ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नेत्ररोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. लहाने यांनी आतापर्यंत हजारो शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवी दृष्टी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar, campaigner, Udayanraje,
शरद पवारच माझे मुख्य प्रचारक – उदयनराजे
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

सामाजिक कार्याचा सन्मान

‘जन्मापासून मी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या लोककार्याचा आदर करीत आलो आहे. त्यांनी वंचित लोकांसाठी विकासाचे दरवाजे उघडे केले होते. त्यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन मी सर्वसामान्य १ लाख ६२ हजार लोकांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने माझ्या वैद्यकीय, सामाजिक कार्याचा सन्मान झाला असून तो माझ्या असंख्य रुग्णांना समर्पित करतो,’ अशी प्रतिक्रिया लहाने यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना दिली.