महापालिकेतील सर्व विभागात गलथान आणि गरकारभार कसा चालतो हे लेखा परीक्षण अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या ताशेऱ्यांवरून नुकतेच उघडकीस आले. केवळ  के.एम.टी. या महापालिकेच्या परिवहन विभागात पावणे तीन कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यास कार्यशाळेचे अधिकारी एम.डी. सावंत यांना जबाबदार धरण्यात आल्याची माहिती देऊन नगरसेवक भूपाल शेटे यांनी ही रक्कम सावंत यांच्याकडून वसूल करून कारवाई करावी, अशी मागणी महासभेत केली.

कोल्हापूर महापालिकेच्या सन २०१२ -१३ सालातील स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालातील  त्रुटींचे अनुपालन करण्याचा प्रस्ताव नुकताच मुख्य लेखापाल  कार्यालयाने सादर केला. हा विषय चच्रेला आल्यावर शेटे यांनी ,महापालिकेतील सर्व विभागात गरकारभार  कसा चालतो यावर तिखट शब्दात हल्ला चढवला. के . एम . टी. महापालिकेच्या परिवहन विभागात कशा प्रकरे गलथान कारभार चालतो हे त्यांनी कागदपत्राधारे स्पष्ट  केले. या विभागाचे अधिकारी सावंत हे वर्क्‍स मॅनेजर पदास अपात्र आहेत. या जागी सहायक अभियंता असणे गरजेचे आहे.

सावंत हे अभियंता नाहीत.  पूर्वी ते घाटगे – पाटील कंपनीत असताना त्यांना निलंबित केले होते. शारंगधर देशमुख, सत्यजित कदम  यांनी सावंत यांच्या कंटेनर दुरुस्तीमध्ये घोटाळा कसा केला आहे ते सविस्तर सांगितले.

महापालिकेच्या घरफाळा, पाणीपुरवठा, बांधकाम, वाहनतळ अशा अनेक विभागात घोटाळे झाले असून त्याची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी शेटे यांनी केली. आयुक्त पी . शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना नोटीस दिल्याचे सांगून गरज पडल्यास चौकशी करणार असल्याचा खुलासा केला.