मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठय़ा उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा झाला. ऐतिहासिक दसरा चौक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून सीमोल्लंघन करण्यात आले. शमीपूजन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी ऐतिहासिक दसरा चौकात सोने लुटण्याच्या सोहळ्याचा आनंद लुटला. प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही या सोहळ्याला उपस्थिती लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील प्रमुख सोहळ्यांपकी एक आणि म्हैसूरपाठोपाठ असलेला शाही दसरा म्हणून याची ओळख आहे.  संस्थानकालीन परंपरा असलेल्या शाही दसरा सोहळ्याच्या सीमोल्लंघनासाठी दुपारपासूनच शहरात लगबग सुरू होती. सूर्यास्ताच्या वेळी सोने लुटण्याचा कार्यक्रम येथील दसरा चौकात परंपरेप्रमाणे आयोजित केला होता. यासाठी निमंत्रितांसह मानकरी व नागरिकांना बसण्यासाठी अलिशान शामियाना उभारण्यात आला होता. साडेपाच वाजता श्री महालक्ष्मी, श्री भवानी आणि श्री गुरुमहाराज यांच्या पालख्या लवाजम्यासह दसरा चौकात आल्या. सायंकाळी  ६ वाजता मेबॅक मोटारीतून न्यू पॅलेसवरून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजे शाही लवाजम्यासह बाहेर पडले. दसरा चौकात त्यांचे पोलीस बँड पथक आणि आर्मी बँड पथकाने स्वागत करण्यात आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahi dasara celebration in kolhapur
First published on: 13-10-2016 at 01:39 IST