राज्यसभा सदस्यत्वाचा स्वीकार संभाजीराजे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच दिवसात दोनदा टीका केल्यानंतर आता करवीर नगरीतील संभाजीराजे यांच्या निकटवर्तीयांनी पवार यांना लक्ष्य केले आहे. मराठा समाजाची मतपेटी संभाजीराजे यांच्यामुळे भाजपकडे जाण्याची भीती निर्माण झाल्यानेच पवार अशी भाषा वापरत असल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात आल्यानंतर पवार यांनी शनिवारी संभाजी राजे यांच्यावर पहिल्यांदा टीका केली. संभाजीराजे यांना भाजपच्या शिफारशीवरून राज्यसभा सदस्यपदी निवड झाली असल्याच्या मुद्दय़ावर पवार यांनी ‘फडणवीस यांच्याकडून छत्रपती निवडला गेला’ अशी टीका करत मुख्यमंत्र्यांबरोबरच संभाजीराजांवर टीका केली होती.

आपल्याला जे करता आले नाही ते दुसऱ्याने केल्याने पवारांची अडचण झाली आहे, असे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत म्हणाले.

 

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on government
First published on: 30-06-2016 at 02:27 IST