मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकभावनेचा आदर करत ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्ताराचा प्रस्ताव कुलपती यांच्यासमोर ठेवला आहे. शिवाजी विद्यापीठाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार होणारच, अशी भूमिका शिवसेना शहर शाखेने शुक्रवारी स्पष्ट केली.

नामविस्ताराच्या प्रस्तावाला कोल्हापूरचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे व इतर लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना शिवस्मरण हृदयाशी कवटाळून लढणारी एक लढवय्यी संघटना आहे. त्यामुळे या नामविस्तारात काथ्याकुट करणाऱ्या ज्येष्ठांनीही लोकभावनेचा आदर ठेवून काम करावे. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणारच. शहरातील तालीम संस्था,मंडळे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.