राधानगरी तालुक्यातील मानबेट येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम करताना शक्तिशाली भूसुरुंगाचा वापर होत आहे. त्याचा आवाज तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे बसत आहेत. पाण्याचे स्त्रोत बंद होऊ लागले आहेत.
धामणी मध्यम प्रकल्पाचे काम मोठ्या संघर्षानंतर सहा महिन्यापासून सुरू झाले आहे. प्रकल्पातील सांडव्याचे काम सुरू असलेला डोंगराचा भाग टणक दगडाचा आहे. तो फोडण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून शक्तिशाली भूसूरुंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
प्रश्न वाढले
त्याच्या जोरदार हादरयामुळे परिसरातील गावातील घरांना तडे गेले आहेत. झऱ्यातून येणारे चे पाण्याचे स्त्रोत बंद झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भूसुरंगाच्या प्रचंड लोटामुळे परिसरातील शेतपिकांवर धुळीचा थर साचला आहे. धुळीने माखलेल्या चारा खाल्ल्यामुळे जनावरे आजारी पडत आहेत. या कामामुळे मानबेट गावचे वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा त्रास वयोवृद्ध ग्रामस्थांसह मुलांना होऊ लागला आहे, असे मालबेटचे सरपंच संभाजी कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवले आहे. या
मंगळवारी बैठक
प्रकल्प कामातून निर्माण होणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवारी मानबेट ग्रामपंचायत येथे ग्रामस्थ, पाटबंधारे अधिकारी, ठेकेदार कंपनी यांची संयुक्त चर्चा होणार असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेचे भिकाजी गुरव यांनी सोमवारी सांगितले.