‘ब्लॉग’ या माध्यमाचे शक्तिस्थान किती प्रभावी आहे याची जाणीव ‘ब्लॉगबेंचर्स’ या ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या उपक्रमामुळे झाली. या स्पध्रेमुळे मनातील विचार व्यक्त होण्यासाठी सशक्त माध्यम गवसले, अशी भावना ‘बेदिलीचे बादल’ या विषयावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या विक्रम सावंत या विजेत्याने व्यक्त केली. ‘ब्लॉगबेंचर्स’मधील हा विजेता कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात शिकणारा आहे. गडिहग्लजजवळील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिमलेश कुमार यांच्या हस्ते सावंत याला सात हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने विक्रम भारावला होता. आपले मत मांडताना तो म्हणाला की, ‘लोकसत्ता’मुळे मला व्यापक प्रमाणात व्यक्त होण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन युवकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे ‘ब्लॉगबेंचर्स’ हे सशक्त मध्यम आहे. त्याचबरोबर एखाद्या विषयावर, मुद्दय़ावर मला काय वाटते आणि इतरांना काय वाटते याचा आढावा घेत येतो. असे उपक्रम वाढले तर तरुण अधिक प्रमाणात विचार, लेखन, मनन करू लागतील. त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होईल, अशी भावना त्याने व्यक्त केली. सन्यदलात कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विक्रम झटून अभ्यास करतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram sawant loksatta blog benchers winner
First published on: 29-04-2016 at 01:07 IST