कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकसभेत असणे गरजेचे आहे. यासाठी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून लढवून जिंकणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी रात्री पारगांव येथे संपर्क दौऱ्यानिमित्त बोलताना केले.

देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी लोकांचा आवाज संसदेत पुन्हा त्याच ताकदीने मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवित असून सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरती परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, सामाजिक अस्वस्थता यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. या प्रश्नावर बोलण्याची हिम्मत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये नाही. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवित असून यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसू लागला आहे.

Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
sambhajinagar shivsena dalit votes marathi news
शिवसेना शिंदे गटाकडून दलित मतांसाठी नवी जुळवाजुळव
Buldhana, farmers, agriculture officials,
बुलढाणा : संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव! काय आहे कारण जाणून घ्या…
Misleading women for Bachchu Kadus march by saying that they are taking them for a trip
बच्चू कडूंच्या मोर्चासाठी महिलांची दिशाभूल; सहलीसाठी नेत असल्याचे…
MNS, land allotment, mill workers houses, Hedutane, Uttarshiv, Dombivli, marathi news, latest news
डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध
Partha Pawar reviewed the flood situation in Pimpri Chinchwad city
पिंपरी- चिंचवड शहरातील पूर परिस्थिती; पार्थ पवारांनी घेतला आढावा
Ajit pawar on Pune Dam Water alert
पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा; धरणांतून विसर्ग सुरू, अजित पवार म्हणाले…

हेही वाच – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा – सोलापुरात वंचितच्या उमेदवारीमुळे मतविभागणी टाळण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

आज दिवसभरात राजू शेट्टी यांनी हातकंणगले तालुक्यातील निलेवाडी, नवे पारगांव, जुने पारगांव, तळसंदे, चावरे, वाठार, किणी व घुणकी या गावांचा संपर्क दौरा केला. यावेळी वरील गावातील जनतेशी संवाद साधत निवडणुकीत सक्रिय होवून प्रचार करण्याची विनंती केली.