कोल्हापूर : अंगभूत वैविध्यपूर्ण कलागुणांचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करता येणे सहज शक्य आहे. कलाकृतीतून समाजासाठी घडणारे कार्य आपल्याला आत्मिक समाधान देते, असे प्रतिपादन निष्णात मणका सर्जन डॉ. शेखर भोजराज यांनी रविवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील पहिले विशेष समर्पित सर्जन डॉ. भोजराज हे गेल्या २२ वर्षांपासून स्पाईन फाउंडेशन मार्फत देशभरात दुर्गम भागातील गरिबांवर मोफत मणक्यांची शस्त्रक्रिया करत आहेत. फाउंडेशनचे ४५ हून अधिक डॉक्टर अशी सेवा बजावत आहेत. चित्रकलेच्या छंदातून डॉ.भोजराज यांनी अनेक कलाकृतींची निर्मिती केली असून त्यांच्या कलाकृतीचे दोन दिवसांचे प्रदर्शन येथे आयोजित केले होते. यामधून जमा होणारा निधी हा गरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी होणार आहे. आज या प्रदर्शनाची सांगता झाली. डॉ. भोजराज म्हणाले,की ऐतिहासिक कोल्हापूरच्या या कलानगरीत आपल्या कलाकृतीला मिळालेली दाद प्रेरणादायी आहे. येथील अनेक कलाकारांची कलाकारी म्हणजे या मातीचा उपजत गुणच आहे. डॉ. रघुप्रसाद वर्मा,डॉ. तुषार देवरे,डॉ. प्रेमिक नगड, डॉ. सलीम लाड,डॉ. संदीप पाटील,ममता देसाई, जॉय चौधरी आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work done for the society through art gives us spiritual satisfaction dr shekhar bhojraj zws
First published on: 23-05-2022 at 00:04 IST