लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथे आंतरजिल्हा तपासणी नाक्यावर मालट्रकमधून होत असलेली गुटखा तस्करी सांगली ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणून सुमारे १५ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क विभागातून रविवारी देण्यात आली.

karan rajkaran Kolhapur north assembly
कारण राजकारण: ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वच पक्ष चेहऱ्याच्या शोधात
Controversy over the questionable stance of the grand alliance government on the Shaktipeeth highway
शक्तिपीठ मार्गावरून महायुती सरकारच्या संदिग्ध भूमिकेने वाद
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
chhatrapati shivaji maharaj statue collapsed
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : चेतन पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत; कोल्हापूर पोलिसांची कारवाई
malvan Shivaji maharaj statue collapse
शिल्पकार आणि सल्लागार ‘गायब’
Raje Samarjeetsinh Ghatge Join To NCP Sharad Pawar Group
कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतराला जोर    
Rain Kolhapur. Kolhapur river, Kolhapur dam,
कोल्हापुरात पावसाचा मुक्काम कायम : नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ
Dahi Handi Kolhapur, Kolhapur rain,
कोल्हापुरातील दहीहंडीवर राजकीय प्रभाव; पावसातही उत्साह

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा हद्दीच्या ठिकाणी तपासणी नाके कार्यरत करण्यात आले आहेत. अंकली येथे मालट्रक (एमएच ५०-७४२९) तपासणी नाक्यावर आला असता चौकशीसाठी थांबण्याचा इशारा पथकातील पोलीस रमेश पाटील, असिफ नदाफ व सतिश सातपुते यांनी केला. मात्र, पोलीसांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून ट्रक तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून थांबविण्यात आला.

आणखी वाचा-केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे सामूहिक उपोषण

ट्रकमधील मालाची तपासणी केली असता टोबॅको हॅपी होली, विमल गुटखा, आरएमडी सुगंधी तंबाखू, पानमसाला असा प्रतिबंधित माल आढळून आला. याची किंमत १४ लाख ८५ हजार ९२० रूपये असून सात लाखाच्या ट्रकसह सर्व माल जप्त करण्यात आला. ही कारवाई उप अधिक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षम राजेश रामाघरे यांच्या पथकाने केली. या प्रतिबंधित मालाची वाहतूक केल्या प्रकरणी सलीम मुजावर (वय ३५ रा. शंभर फुटी रोड, सांगली) आणि इरशाद मुलाणी (रा. ख्वॉजा कॉलनी, मिरज) या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.