11 August 2020

News Flash

Video : अफगाणिस्तानच्या शहझादने केला Dhoni Style रन आऊट

त्याचा 'हा' व्हिडीओ प्रचंड वायरल होत आहे

जगातील सर्वात चपळ यष्टीरक्षक कोण? हा प्रश्न विचारल्यानंतर बहुतांश क्रिकेटप्रेमी भारताच्या महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतात. वयाची पस्तीशी ओलांडूनही तो तितक्याच चपळाईने यष्टिरक्षण करतो. क्रिकेट जगतामध्ये महेंद्रसिंग धोनीचे एक अढळ स्थान आहे. यष्टीरक्षक म्हणूनही धोनीचा लौकिक आहे. मात्र धोनीसारखीच चपळाई अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शेहझादनेही दाखवली आहे.

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये (BPL) शेहझादने एका सामन्यात Dhoni Style रन आऊट केला. त्याचा व्हिडीओ वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

चितगांव वायकिंग्स आणि ढाका डायनामाइट्स यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात शेहझादने मिजानुर रहमानला रन आऊट केले. त्याच्या बॅटला चेंडू लागला आणि चेंडू स्टंपकडे येऊ लागला. त्यावेळी चपळाई दाखवत त्याने रहमानला रन आऊट केले. त्याची बाद करण्याची पद्धत पाहून अनेकांना धोनीने आधी केलेला रन आऊट आठवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2019 8:03 pm

Web Title: afghanistan wicket keeper ahmed shehzad run out dhoni style
Next Stories
1 लोकेश राहुलच्या फॉर्मची चिंता करू नका – द्रविड
2 चेंडू खेळता न आल्याने पाकिस्तानच्या खेळाडूने मैदानावरच दिली शिवी
3 स्टार टेनिसपटू राफेल नदाल Engaged
Just Now!
X