News Flash

श्रेयस अय्यरने शेअर केला सुश्मिता सेनसोबतचा फोटो

या फोटोला चांगलीच पसंती

श्रेयसने सुश्मिता सेन सोबतचा फोटो इन्स्टाग्रा अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे सामन्यासाठी संघाची घोषणा केली. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि सिद्धार्थ कौल यांची न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा भारतीय संघात वर्णी लागली. आगामी मालिकेत निवड झाल्यानंतर श्रेयस अय्यर चर्चेत आला आहे. याशिवाय त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळेही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रेयस अय्यरने बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिवर्स सुष्मितासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्याने शेअर केलेल्या या फोटोला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

श्रेयस सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. यापूर्वी त्याने अनेकदा क्रिकेटच्या मैदानात सराव करतानाचे, मित्रांसोबत भ्रमंतीचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. मात्र, सुष्मिता सेनसोबतच्या त्याच्या फोटोला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी सांगायचे तर, वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात श्रेयसला मिळालेली ही पहिलीच संधी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात कोहलीच्या दुखापतीनंतर भारतीय कसोटी संघात त्याची वर्णी लागली होती. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात श्रेयसने भारताचे प्रतिनिधीत्व केले. टी-२० मालिकेतील दोन सामन्यात तो अनुक्रमे २३ आणि ६ अशा प्रकारे धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर तो पुन्हा देशांतर्गत क्रिकेट सामन्यासाठी मैदानात उतरला. नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील पाच डावात ८९ ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. कोहलीच्या अनुपस्थित भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर संधीच सोनं करुन आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघात स्थान कायम राखण्यासाठी श्रेयस प्रयत्नशील असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 11:07 am

Web Title: after odi recall shreyas iyer poses with sushmita sen
Next Stories
1 मुंबईचा ‘खडूस’ खेळ, त्रिपुरावर १० गडी राखून मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
2 Photos: महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे ‘ब्लॅकबेल्ट’, पुत्र आर्यमनलाही ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक
3 कुटुंबवत्सल प्रशिक्षक बेर्गामास्को भारताच्या यशाचे शिल्पकार
Just Now!
X