देवदत्त नातू याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आलोच क्लबने सदू शिंदे साखळी क्रिकेट स्पर्धेतील रविवार विभागात अजिंक्यपद मिळविले. अंतिम फेरीत त्यांनी एसबीएम क्लबचा पाच गडी राखून पराभव केला. त्यांना सर्जेराव चषक देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना एसबीएम संघाचा डाव ३५.४ षटकांत १८५ धावांत आटोपला. त्यामध्ये अलोक नागराज याने सर्वाधिक ४० धावा केल्या. आलोच क्लबकडून कुलदीप नायडू याने चार बळी घेतले तर नातू याने तीन बळी घेतले. आलोच क्लबने ३०.३ षटकांत व पाच गडय़ांच्या मोबदल्यात १८६ धावांचे लक्ष्य पार केले. त्यामध्ये परिक्षित जाधव याने केलेल्या नाबाद अर्धशतकाचा महत्त्वाचा वाटा होता. देवदत्त नातू याला अंतिम सामन्याचा सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. संक्षिप्त निकाल-एसबीएम क्लब-३५.४ षटकांत सर्व बाद १८५ (आलोक नागराज ४०, मंदार भंडारी ३७, अझहर शेख ३७, कुलदीप नायडू ४/४४, देवदत्त नातू ३/२४, राघव खेडकर २/१८) पराभूत वि. आलोच क्लब ३०.३ षटकांत ५ बाद १८८ (परिक्षित जाधव नाबाद ६२,  देवदत्त नातू ३९, मधुर जेटलिया २४, पवन आनंद २/३९, उमेश देवधर २/२५)