News Flash

अमर िहद, जे. जे. हॉस्पिटल, जेपीआर अजिंक्य

महिलांमध्ये अमर िहद आणि शिवशक्ती यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगला.

पुरुषांच्या व्यावसायिक ‘अ’ गटातील विजेत्या जे. जे. हॉस्पिटलचा संघ महिलांमध्ये जेतेपद पटकावणाराअमर िहद मंडळाचा संघ

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रमिक जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पध्रेत महिलांमध्ये अमर िहद मंडळ, पुरुषांच्या व्यावसायिक ‘अ’ गटात जे. जे. हॉस्पिटल आणि स्थानिक गटात जेपीआर स्पोर्टस् क्लबने विजेतेपद पटकावले.
महिलांमध्ये अमर िहद आणि शिवशक्ती यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगला. अमर िहदने दीप्ती पारकरचा अष्टपैलू खेळ आणि तेजश्री सारंगच्या पकडींच्या बळावर शिवशक्तीला १५-१२ असे हरवले. शिवशक्तीकडून पूजा यादवने अप्रतिम खेळ केला. अमर हिंदची दीप्ती सर्वोत्तम खेळाडू ठरली.
व्यावसायिक गटात जे. जे. हॉस्पिटलने सिद्धी बाबा संघावर १५-१३ अशी मात केली. विजयी संघाकडून मयूर शिवतरकरने अप्रतिम चढाया आणि रोहित शिवतरकरने लाजवाब खेळ केला. सिद्धी बाबा संघाचे विशाल चिंदरकर यांनी चिवट झुंज दिली. जे.जे.चा सुनील दुबे सवरेत्कृष्ट खेळाडू ठरला.
स्थानिक ‘ब’ गटात धारावीच्या जेपीआर स्पोर्टस् क्लबने महागाव तरुण मंडळाचा ३१-११ असा धुव्वा उडवला. जेपीआरचा विवेक नाड सर्वोत्तम ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 4:31 am

Web Title: amarhind j j hospital jpr celebrating winning victory
Next Stories
1 ‘हुकमाचा सामना’ आणि बरेच काही..
2 भारताचा इंग्लंडवर विजय
3 बडोद्याचा महाराष्ट्रावर विजय
Just Now!
X