रामेश्वर येथे आयोजित महाराष्ट्र महावीर कुस्ती स्पध्रेचा किताब सांगलीच्या अण्णा कोळेकर याने पटकावला. कोल्हापूरच्या संग्राम पाटील याला त्याने अडीच मिनिटांत चीतपट केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी (पुणे) व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र महावीर खुल्या गटाची स्पर्धा   कोळेकरने जिंकली. कोल्हापूरचा कौतुक ढाकले तिसऱ्या, तर लातूरचा शैलेश शेळके चौथ्या क्रमांकावर राहिला. कोळेकर यास ५१ हजार रुपये रोख, चांदीची गदा देऊन आशियाई पदकविजेते नरसिंग यादव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. िहदकेसरी अमोल बराटे, आमदार सुधाकर भालेराव व विनायकराव पाटील आदी उपस्थित होते. ‘‘पुढील वर्षी महाराष्ट्र महावीर मल्लास सव्वा लाखाचे रोख बक्षीस दिले जाणार आहे, ’’ असे माईर्सचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड यांनी जाहीर केले. थोर कुस्तीगीरांच्या नावाने ९ विविध गटांतील विजेत्यांना प्रत्येकी सव्वातोळा वजनाचे पदक दिले जाणार आह़े