महाराष्ट्राची हैद्राबादवर मात
अनुजा पाटील हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने महिलांच्या आंतर राज्य ट्वेन्टी२० स्पर्धेत हैद्राबादविरुद्ध दोन गडी राखून विजय मिळविला.
ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या अनुजा पाटील व देविका वैद्य यांनी प्रभावी गोलंदाजी केली, त्यामुळे हैद्राबादचा डाव २० षटकांत केवळ ९२ धावांमध्ये आटोपला. हैद्राबादकडून डायना डेव्हिड हिने सर्वाधिक १८ धावा केल्या. विजयासाठी ९३ धावांचे सोपे लक्ष्य साधताना महाराष्ट्राला झगडावे लागले. त्यासाठी त्यांना २० व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली तसेच त्यामध्ये त्यांनी आठ गडीही गमावले. अनुजा पाटील (३५) व मुक्ता मागरे (२०) यांनी दमदार खेळ करीत संघास विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : २० षटकांत सर्वबाद ९२ (डायना डेव्हिड १८, एम.शालिनी १४, अनुजा पाटील ३/१५, देविका वैद्य ३/१०) पराभूत वि. महाराष्ट्र १९.३ षटकांत ८ बाद ९३ (अनुजा पाटील ३५, मुक्ता मागरे २०, अनया उपेंद्रन ३/१४).