भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये स्थान मिळाल्याने डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टॉन अगर आश्चर्यचकित झाला आहे. २१ वर्षीय अगरने बिग बॅश ट्वेन्टी-२० स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर येथील खेळपट्टी पारंपरिक असल्याने चौथ्या आणि पाचव्या दिवशी चेंडू चांगला वळण्याची शक्यता आहे. ‘‘माझ्यासाठी संघामध्ये स्थान मिळणे हे आश्चर्यकारक आहे, मी या गोष्टीचा विचारही करत नव्हतो. पण या निर्णयाने मी आनंदी आणि उत्साही झालो आहे. मला पहिल्यांदा या निर्णयाचा धक्का बसला असला तरी माझे स्वप्न सत्यात उतरण्याचा आनंद आहे,’’ असे अगर म्हणाला.