29 October 2020

News Flash

Asia Cup 2018 : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ९ विक्रमांची नोंद, धोनीच्या नावावर ३ विक्रम

भारताला बरोबरीत रोखण्यात अफगाणिस्तान यशस्वी

महेंद्रसिंह धोनी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात

आशिया चषकात Super 4 गटातील अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला बरोबरी रोखलं. चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यामुळे हा सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला गेला. त्यातच पंचांनी कालच्या सामन्यात काही वादग्रस्त निर्णयही दिले. राशिद खानच्या अखेरच्या षटकात विजयासाठी १ धाव हवी असताना रविंद्र जाडेजाने उंच फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट फेकली, आणि सामना बरोबरीत सुटला. दरम्यान कालच्या सामन्यात तब्बल ९ विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

१ – महेंद्रसिंह धोनी हा आता भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने वयाच्या ३६ वर्ष १२४ दिवसापर्यंत भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. रोहितच्या अनुपस्थितीत कालच्या सामन्यात धोनीने ३७ वर्ष ८० व्या दिवसात भारताचं नेतृत्व करुन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : He is Back ! तब्बल दीड वर्षाच्या कालवाधीनंतर धोनीचं कर्णधार म्हणून पुनरागमन

२ – भारताकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळणाऱ्यांच्या यादीत धोनी आता दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने राहुल द्रविडला मागे टाकलं आहे, द्रविडने ५०४ सामने खेळले असून धोनीच्या नावावर ५०५ सामने जमा झाले आहेत. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर ६६४ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे.

२ – अफगाणिस्तानच्या वन-डे क्रिकेट इतिहासात आतापर्यंत दोनदा अहमद शेहजादचा सर्वोच्च १२४ धावांचा विक्रम मोडला आहे. यातील एकदा शेहजादनेच आपला विक्रम मोडला होता, झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात त्याने १३१ धावांची खेळी केली होती. तर नवरोज मंगलने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १२९ धावा केल्या होत्या.

३ – रिकी पाँटींग आणि स्टिफन फ्लेमिंग यांच्यानंतर आपल्या संघाचं २०० व्या सामन्यात नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : २३ महिन्यांनंतर धोनीला मिळालं कर्णधारपद पण…

३ – अनिर्णित राहिल्या वन-डे सामन्यात शेवटच्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला १० धावा न करु देणाऱ्या गोलंदाजांमध्ये राशिद खान तिसरा गोलंदाज ठरलाय.

५ – कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीच्या नावावर सर्वाधिक अनिर्णित सामन्यांची नोंद आहे. धोनीच्या काळात आतापर्यंत ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. रिची रिचर्डसन, स्टिव्ह वॉ आणि शॉन पोलॉक यांच्या कर्णधारपदाच्या काळात ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

अवश्य वाचा – सामना बरोबरीत सुटला अन् धोनीच्या नावे झाला ‘हा’ विक्रम

८ – भारताच्या वन-डे इतिहासातला हा आठवा अनिर्णित सामना ठरला. अफगाणिस्तान हा भारतासाठी सामना अनिर्णित राहिलेला सहावा संघ ठरला आहे.

१० – मोहम्मद शेहजादच्या शतकामुळे अफगाणिस्तान भारताविरुद्ध शतक ठोकणारा दहावा देश ठरला आहे.

३६ – आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ४०४६ वन-डे सामन्यांपैकी कालचा सामना हा ३६ वा अनिर्णित सामना ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 2:10 pm

Web Title: asia cup 2018 ind vs afg these 9 records were made and broken by both countries player
Next Stories
1 Asia Cup 2018 : सामना बरोबरीत सुटला अन् धोनीच्या नावे झाला ‘हा’ विक्रम
2 Asia Cup 2018 : आशिया चषकावर नाव कोरून पाकिस्तान संघ पराभवाचा बदला घेणार – मिकी आर्थर
3 दोन वाहिन्यांच्या कुस्तीत शरद पवारांची यशस्वी मध्यस्थी
Just Now!
X