आजचा दिवस भारतीय क्रीडाप्रेमींसाठी मिश्र स्वरूपाचा ठरला. भारताला हॉकीमध्ये मलेशियाकडून पराभूत व्हावे लागले. तर त्यानंतर झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताला चांगले यश मिळाले. भारताच्या महिला संघाने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये तर जीन्सन जॉन्सनने १५०० मीटर धावणे या प्रकारात भारताला सुवर्ण कमाई करून दिली. याशिवाय, पुरुष संघाने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये भारताला रौप्यपदक पटकावले. तर थाळीफेकमध्ये भारताच्या सीमा पुनियाला कांस्यपदक आणि १५०० मी. शर्यत (महिला) मध्ये चित्रा उन्नीकृष्णनला कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचं आव्हान संपुष्टात आले. साखळी फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारतीय संघाला मलेशियाने पेनल्टी शूटआऊटवर ७-६ ने मात केली. या पराभवासह २०२० टोकियो ऑलिम्पीकमध्ये थेट प्रवेश करण्याचं भारतीय हॉकी संघाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी साधली. यामुळे सामना शूटआऊटवर नेण्यात आला. यावेळी मलेशियाचा गोलकिपर कुमार सुब्रमण्यमने एस. व्ही. सुुनीलचा फटका अडवत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
साखळी फेरीत आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून चांगलीच कडवी टक्कर मिळाली. मलेशियाच्या अभेद्य बचाव भेदणं भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंना जमलं नाही. पहिल्या दोन सत्रांमध्ये मिळून भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या ५ पेक्षा जास्त संधी चालून आल्या होत्या, मात्र एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करणं भारतीयांना जमलं नाही. मलेशियाचे खेळाडूही पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयशी ठरले. मलेशियाचा गोलकिपर एस.कुमार आणि भारताचा पी. आर. श्रीजेश यांनी मध्यांतरापर्यंत चोख कामगिरी बजावली.
मध्यांतरानंतर तिसऱ्या सत्रात अखेर भारताने गोलपोस्टवरची कोंडी फोडली. ३३ व्या मिनीटाला भारताचा युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने रवी कुमारचा बचाव भेदून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ५ प्रयत्नांनंतर सहाव्या प्रयत्नात गोल करण्यात भारतीय संघाला यश आलं. यानंतर मलेशियाच्या संघाने जोरदार आक्रमण करण भारताची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. अखेर ३८ व्या मिनीटाला भारतीय बचावफळीतला कमकुवतपणा हेरुन मलेशियाने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र मलेशियाचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. ४० व्या मिनीटाला भारताने पेनल्टी कॉर्नरवर सुरेख चाल रचत मलेशियाचा बचाव भेदून सामन्यात २-१ अशी बरोबरी साधली. अखेरीस तिसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताने २-१ अशी आघाडी कायम राखली.
चौथ्या सत्रात मलेशियाच्या संघाने आपल्या खेळाची गती अधिक जलद करत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामधूनच मलेशियाने चौथ्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर गमावले. मात्र भारतीय गोलकिपर पी. आर. श्रीजेशने मलेशियाचे सर्व मनसुबे उधळून लावले. सामना संपण्यासाठी अखेरची ३ मिनीटं शिल्लक असताना भारतीय संघाने कोणताही धोका न पत्करता बॉलचा ताबा जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवण्यास सुरुवात केली. मात्र सामना संपण्यासाठी अखेरचं दीड मिनीटं शिल्लक असताना मलेशियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी साधली. अखेर शूटआऊटमध्ये मलेशियाने बाजी मारत अंतिम फेरीतलं आपलं स्थान नक्की केलं.
Highlights
४ x ४०० मीटर रिले पुरूष
भारताने ४ x ४०० मीटर रिले पुरूष गटात रौप्य पदक पटकावले.
४ x ४०० मीटर रिले महिला
भारताने ४ x ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्णपदक पटकावले.
अॅथलेटिक्स - १५०० मी. शर्यत (पुरुष)
भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक, मनजीत सिंह चौथ्या स्थानावर
अॅथलेटिक्स - १५०० मी. शर्यत (महिला)
चित्रा उन्नीकृष्णन तिसऱ्या स्थानावर, भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर
अॅथलेटिक्स - थाळीफेक
भारताच्या सीमा पुनियाला कांस्यपदक
स्क्वॉश - महिला
अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला हाँग काँग कडून १-२ ने पराभूत. मात्र गटात दुसरं स्थान मिळवल्यामुळे भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. शुक्रवारी भारतीय महिलांचा सामना अ गटातील विजेत्या मलेशियाविरुद्ध होणार.
भारताच्या साथीयां ग्नानाेसेकरनची 'अंतिम १६'च्या फेरीत धडक
भारताने ४ x ४०० मीटर रिले पुरूष गटात रौप्य पदक पटकावले.
भारताने ४ x ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्णपदक पटकावले.
भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक, मनजीत सिंह चौथ्या स्थानावर
चित्रा उन्नीकृष्णन तिसऱ्या स्थानावर, भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर
भारताच्या सीमा पुनियाला कांस्यपदक
भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात, उपांत्य सामन्यात मलेशियाची भारतावर पेनल्टी शूटआऊटवर ७-६ ने मात
भारताच्या अचंता शरथ कमालची पाकिस्तानच्या मोहम्मद आसिम कुरेशीवर ४-० ने मात
भारताचा दानिश शर्मा ९० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुढच्या फेरीत विजय मिळवल्यास भारताला Kurash मध्ये एक पदक निश्चीत होणार
अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला हाँग काँग कडून १-२ ने पराभूत. मात्र गटात दुसरं स्थान मिळवल्यामुळे भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. शुक्रवारी भारतीय महिलांचा सामना अ गटातील विजेत्या मलेशियाविरुद्ध होणार.
अटीतटीच्या लढाईत म्यानमारची भारतावर ३-२ ने मात
भारताची ज्योती टोकस पहिल्याच सामन्यात १०-० ने पराभूत
उझबेगिस्तानच्या खेळाडूकडून भारताची गरिमा चौधरी १०-० ने पराभूत
भारताच्या मौमा दासला पराभवचा धक्का, चीन तैपेईच्या प्रतिस्पर्धीने ४-० ने केला पराभव
भारताच्या हर्षदीपचंं आव्हान संपुष्टात, कोरियन प्रतिस्पर्ध्याची हर्षदीपवर मात
अंतिम फेरीत भारतीय महिला अखेरच्या तर पुरुषांचा संघही अव्वल स्थान राखण्यात अपयशी
भारताचा संदीप कुमार स्पर्धेमधून बाहेर
८१ किलो वजनी गटात भारताच्या हर्षदीप सिंहची श्रीलंकेच्या रजित पुष्पकुमारावर मात, पुढच्या फेरीत प्रवेश