आशियाई क्रीडा स्पध्रेतील स्क्वॉश क्रीडा प्रकारात भारताला चारही विभागात पदकाची अपेक्षा आहे. पुरुषांमधील अव्वल मानांकित सौरव घोषालवर भारताच्या संघाच्या अपेक्षा असतील. १९९८मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पध्रेपासून स्क्वॉशचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून भारताने आतापर्यंत चार कांस्यपदके कमावली आहेत. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेली देशातील अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने सांगितले की, ‘‘पुरुष सांघिक आणि एकेरी याचप्रमाणे महिला सांघिक आणि एकेरीत प्रकारात भारताला पदक मिळू शकेल.’’