भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेसह आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात वृद्धिमान साहासोबत पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंका कसोटी मालिकेत संघाबाहेर असणाऱ्या हार्दिक पांड्या आणि  बुमराहने देखील कसोटी संघात पुनरागमन केले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्यातील दोन दिवसांचा खेळ बाकी असताना निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली. यासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी विराटला विश्रांती देण्यात आली असून, एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेसाठी रोहितकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, , वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), पार्थिव पटेल, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या

श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा असेल संघ:
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, वांशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दिपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, एम सुरज, बसील थापी, जयदेव.