इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी आपल्या वन-डे संघाची घोषणा केली आहे. १४ सदस्यीय संघात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने पुनरागमन केलं आहे. वन-डे संघाचं कर्णधारपदही इयॉन मॉर्गनकडे सोपवण्यात आलं असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत ५-० असा विजय मिळवल्यानंतर भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. ३ जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.
इंग्लंडचा वन-डे संघ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्ट्रो, अॅलेक्स हेल्स, जो रुट, जोस बटलर, मोईन अली, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, मार्क वूड, टॉम कूरन, जेक बॉल
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 7:08 pm