20 September 2020

News Flash

आयसीसीने श्रीनिवासन यांची चौकशी करावी

क्रिकेटच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)श्रीनिवासन यांची चौकशी करावी अशी सूचना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांनी केली आहे. आयसीसीच्या विशेष कार्यकारिणी आणि

| June 27, 2013 03:08 am

क्रिकेटच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)श्रीनिवासन यांची चौकशी करावी अशी सूचना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांनी केली आहे. आयसीसीच्या विशेष कार्यकारिणी आणि आंतरराष्ट्रीय विकास बोर्डाला बिंद्रा यांनी हे आवाहन केले.
खेळ प्रशासनातील निर्देशकांनी आयसीसीशी निगडीत आपल्या पदाचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये या कलमाचा बिंद्रा यांनी उल्लेख केला. लंडनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर पत्रात बिंद्रा यांनी ही मागणी केली आहे.
हे पत्र लिहिताना मला अत्यंत वाईट वाटत आहे. कारण या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असणारी जी व्यक्ती बीसीसीआयचे प्रमुखपद भूषवत आहे, ज्याचा मी गेली ३८ वर्ष सदस्य आहे. याच संघटनेचे अध्यक्षपदही मी भूषवले आहे असे बिंद्रा यांनी या पत्रात म्हटले आहे.
पण कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा खेळ मोठा आहे, सत्य लोकांसमोर आले पाहिजे ही भूमिका असल्याचे आयसीसीचे माजी सल्लागार असलेल्या बिंद्रा यांनी मांडली आहे.
बिंद्रा यांनी आयसीसीच्या प्रवक्त्यावरही जोरदार टीका केली आहे. फिक्सिंग प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या श्रीनिवासन यांना आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यास आयसीसीने कोणताही आडकाठी घेतली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:08 am

Web Title: bindra asks icc to probe srinivasan
टॅग Icc,Srinivasan
Next Stories
1 पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत न्यूझीलंडची इंग्लंडवर मात
2 भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस
3 धोनी भारतीय क्रिकेटमध्ये चमत्कार घडवणारा खेळाडू- सौरभ गांगुली
Just Now!
X