News Flash

महान मुष्टियोध्दा मोहम्मद अली रुग्णालयात

७४ वर्षीय अली यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले

माजी मुष्टियोद्धा अली यांना श्वसनाचा त्रास जाणवत असून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महान मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांना फिनिक्समधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील वेळेस जेव्हा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यापेक्षा यावेळेस त्यांची प्रकृती अधिक खालावलेल्याचे सांगण्यात आले. अली श्वसनाच्या त्रासाने ग्रासलेले असून, पार्किन्सनमुळे त्याचा हा त्रास अधिकच जटील झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांकडून ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगण्यात आले. अली यांना श्वसनाचा त्रास जाणवत असून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने एका परिपत्रकाद्वारे सांगितले. ७४ वर्षीय अली यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना काही काळ रुग्णालयात राहावे लागेल असे, प्रवक्ता बाबा गुनेल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात अली यांना अनेकवेळा रुग्णालयात भरती करावे लागले आहे. याआधी २०१५ मध्ये मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:30 pm

Web Title: boxer mohammad ali admit to hospital
टॅग : Boxing
Next Stories
1 भारत-पाकिस्तान सामन्यांवरून आयसीसीचे घुमजाव
2 भारतीय महिला क्रिकेटपटूंना परदेशी लीग खेळण्याची परवानगी
3 भक्ती कुलकर्णी जेतेपदासमीप
Just Now!
X