करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जवळपास ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. यानंतर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेने पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात झाली. लॉकडाउनपश्चात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान यांनी आपापले पहिले सामने खेळले परंतू भारतीय संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर उतरु शकला नव्हता. अखेरीस कोट्यवधी क्रिकेटप्रेमी ज्याची वाट पाहत होते तो दिवस आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब केलं असून, या दौऱ्याचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासाठीचा क्वारंटाइन कालावधी निश्चीत केला असून सिडनीत दोन्ही देशांमधील मालिकेला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ आणि आयपीएल खेळणारे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू युएईवरुन थेट सिडनीला रवाना होतील. अ‍ॅडलेडच्या मैदानावर दोन्ही संघांमधला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केल्याप्रमाणए असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम –

  • पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
  • दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
  • तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
    ————————————————————–
  • पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
  • दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
  • तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
    —————————————————————
  • पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
  • दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
  • तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
  • चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा

मेलबर्नमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता बॉक्सिंग डे कसोटी सामना यंदा मेलबर्नला खेळवला जाणार आहे.