आठवडय़ाची मुलाखत – संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू, समालोचक

प्रशांत केणी, मुंबई</strong>

भारताचा याआधीचा ऑस्ट्रेलियाचा दौरा ऐतिहासिक ठरला होता. चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण फलंदाजी तसेच स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची अनुपस्थिती भारताच्या यशात महत्त्वाची ठरली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरवणे तुलनेने सोपे गेले. पण आगामी मालिकेत त्यांना नामोहरम करणे आव्हानात्मक ठरेल, असे मत भारताचे माजी क्रि के टपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त के ले.

‘‘परदेशात भारताच्या गोलंदाजीची चिंता नाही; परंतु फलंदाजांनी मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाज, खेळपट्टय़ा आणि वातावरणाचे आव्हान समर्थपणे पेलण्याची आवश्यकता आहे,’’ अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी व्यक्त के ली. सोनी टेन क्रीडा वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भातील आव्हानांविषयी मांजरेकर यांच्याशी के लेली खास बातचीत-

*  सध्याच्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कशा प्रकारे विश्लेषण कराल?

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ भारताच्या मागील दौऱ्यापेक्षा अधिक भक्कम असेल. स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुभवामुळे मालिके ची रंगत वाढेल. झुंजार वृत्तीचा फलंदाज मार्नस लबूशेनसाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे. मायदेशातील मालिके त ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर मजबूत असेल.

*  विशेषत: प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची उत्कं ठा शिगेला पोहोचली आहे, याबाबत तुमचे काय मत आहे?

प्रकाशझोतातील कसोटी सामन्याबाबत भारतीय खेळाडूंना चिंता अधिक असते. कारण त्यांच्या वाटय़ाला एकमेव कसोटी आतापर्यंत आली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र प्रकाशझोतातील बरेच कसोटी सामने खेळला आहे. ईडन गार्डन्सवर गतवर्षी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात बांगलादेशला झगडावे लागले होते. प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांचे प्रमाण वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मला वाटते.

*  ‘आयपीएलमध्ये इशांत शर्मा</strong>, भुवनेश्वर कु मार, रविचंद्रन अश्विन यांना दुखापती झाल्या आहेत. भारताची संघनिवड करताना दुखापतींचे आव्हान कितपत असेल?

दुखापतींचे व्यवस्थापन हे कोणत्याही संघापुढील आव्हान असते. संघनिवड झाल्यावर दौऱ्यावर जाण्यापूर्वीही दुखापत होऊ शकते. जुन्या काळात कपिलदेव १३१ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत फक्त एक सामन्याला मुकले होते. परंतु आता ट्वेन्टी-२० क्रि के टचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण आणि फटके बाजीचे तंत्रही विकसित झाल्यामुळे दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. पण कसोटी मालिके साठी संघनिवड करताना अनुभवी इशांत शर्माची तंदुरुस्ती भारताकरिता महत्त्वाची ठरेल.

*  करोनाच्या साथीमुळे बऱ्याच कालावधीनंतर कसोटी सामना भारतीय संघ खेळतो आहे. त्या दृष्टीने सरावसुद्धा कमी झाला आहे. या आव्हानाकडे तुम्ही कसे पाहता?

आमच्या काळात कसोटी मालिके ने दौऱ्याला प्रारंभ व्हायचा. ऑस्ट्रेलियाचा दौरा तर खडतर ब्रिस्बेनपासून सुरू व्हायचा. पण भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यावर प्रथम एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे, त्यानंतर कसोटी मालिका खेळेल. त्यामुळे भारतीय खेळाडूंना वातावरणाशी समरस होता येईल. पूर्वी कसोटी मालिके पूर्वी सराव सामने व्हायचे. त्यामुळे पाहुण्या संघाला चुका सुधारण्याची संधी मिळायची. आता या सर्व चुका पहिल्या कसोटी सामन्यात दिसून येतात. आता मर्यादित षटकांच्या सामन्यांची संख्या वाढल्याने दीर्घकालीन सामन्यांचा सराव तसाही खेळाडूंना कमीच मिळतो.

*  गेल्या काही वर्षांत भारताच्या वेगवान माऱ्याने परदेशातही वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिके त त्यांच्याकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा कराल?

भारताच्या वेगवान माऱ्यातील इशांत, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियात उत्तम कामगिरी बजावतील अशी अपेक्षा आहे. इशांत खेळू शकला नाही, तर युवा नवदीप सैनीचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा फिरकी मारासुद्धा भारताला उपयुक्त ठरेल.

*  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रेक्षकांशिवाय सामने खेळावे लागणार आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता?

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीचा मालिके वर कोणताही परिणाम होणार नाही. जगभरातील चाहते टीव्हीवर सामने पाहत आहेत, याची खेळाडूंना जाणीव असते. कर्णधार विराट कोहलीला मात्र प्रेक्षकांची अनुपस्थिती नक्की जाणवेल.