28 February 2021

News Flash

Video: ऋषभ पंतचा ‘स्पायडरमॅन’ अवतार पाहिलात का?

पंतचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी अहमदाबादमध्ये २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. या मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या दोन कसोटी चेन्नईला होत्या. त्यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि तयारीला लागले. याचदरम्यान ऋषभ पंतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

IPL 2021: दिल्लीला मोठा धक्का; स्टार खेळाडू म्हणतो, “IPL पेक्षा देश महत्त्वाचा…”

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या धडाकेबाज खेळासोबतच मिस्कील स्वभावासाठीही ओळखला जातो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. तेव्हा पंत सुंदरला चिडवण्यासाठी ‘माझं नाव आहे वॉशिंग्टन आणि मला जायचं आहे डीसी’ असं म्हणत मजा करत होता. त्याआधी त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘स्पाडयर मॅन- स्पाडयर मॅन’ गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच गाण्यावरील एक व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.

अर्जुनवर टीका करणाऱ्यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

पाहा व्हिडीओ-

IPL Auction: “माझ्यावर जितकी बोली लागली तेवढे पैसे म्हणजे नक्की किती?”

ऋषभ पंत सध्या अहमदाबादमध्ये पुढच्या कसोटीसाठी सराव करत आहे. पंत व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ वॉशिंग्टन सुंदरने ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये पंत स्पायडरमॅनच्या स्टेपप्रमाणे व्यायाम करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 2:40 pm

Web Title: comedy video rishabh pant spiderman video goes viral watch ind vs eng 3rd test vjb 91
Next Stories
1 IPL 2021: दिल्लीला मोठा धक्का; स्टार खेळाडू म्हणतो, “IPL पेक्षा देश महत्त्वाचा…”
2 Video: हार्दिक पांड्या अन् अश्विनने केला भन्नाट डान्स
3 IPL Auction: “माझ्यावर जितकी बोली लागली तेवढे पैसे म्हणजे नक्की किती?”
Just Now!
X