करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून सर्वत्र जनजागृती केली जात आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

“हिंदू म्हणूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं माझ्याकडे दुर्लक्ष”

ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका मध्येच स्थगित करण्यात आली. त्यानंतर IPL चे आयोजनही लांबणीवर टाकण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या घरातच आहे. करोनाचा आपल्या आप्तेष्टांना फटका बसू नये म्हणून तो आपल्या मुलीला स्वच्छतेचे धडे देत आहे. आपल्या ५ वर्षांच्या लेकीला दिलेल्या टिप्सचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. वॉर्नरने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये मुलीला हात धुण्याचा सल्ला देत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना आपले हात चांगले धुवावेत आणि घरात रहावे असे तो सांगताना दिसतो आहे.

सलाम! करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार सहा महिन्यांचा पगार

डेव्हिड वॉर्नरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, तो आपली मुलगी इंडीशी बोलताना दिसत आहे. वॉर्नरने इंडिला “तु असं का करत आहेस?” असे विचारले. त्यावर “व्हायरसला मारण्यासाठी” असं निरागस उत्तर तिने दिलं. हा व्हिडीओ अपलोड करताना वॉर्नरने ‘आम्ही मुलींना स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहोत. सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे कॅप्शन दिले आहे.