भारताविरुद्ध होणाऱ्या ३ टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेने आज आपल्या संघाची घोषणा केली. १४ जणांच्या आफ्रिकन संघाचं नेतृत्व डावखुरा फलंदाज जे. पी. ड्युमिनीकडे सोपवण्यात आलेलं आहे. १८ फेब्रुवारीपासून ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने कगिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल आणि लुंगी एन्गिडी या ३ जलदगती गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. याचसोबत फलंदाजांमध्ये एडन मार्क्रम आणि हाशिम आमला या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. मात्र एबी डिव्हीलियर्सला टी-२० मालिकेच्या संघातही स्थान मिळालेलं आहे. आफ्रिकेच्या निवड समितीने टी-२० संघात ३ तरुण खेळाडूंना संधी दिली आहे.

भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल आफ्रिकेचा संघ –

जे. पी. ड्युमिनी (कर्णधार), फरहान बेहरदीन, ज्युनिअर डाला, एबी डिव्हीलियर्स, रेझा हेंड्रीक्स, ख्रिस्तीएन जोंकर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ड्युएन पॅटरसन, अॅरोन फंगिसो, अँडल फेलुक्वायो, तबरेझ शम्सी, जे.जे. स्मट्स.