18 November 2017

News Flash

विराटमुळे इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचे ‘ट्रोलिंग’

तिने नेटिझन्सनला केला हा प्रतिप्रश्न

ऑनलाइन टीम | Updated: September 13, 2017 2:27 PM

तुम्ही मला का ट्रोल करताय? असा प्रश्न तिने नेटीझन्सना विचारला.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीमुळे इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डॅनियलने ट्विटरवरुन विराटने गिफ्ट दिलेल्या बॅटचा एक फोटो नुकताच शेअर केला. बॅटच्या खालच्या बाजूला विराटचे नाव लिहिलेले दिसते. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये डॅनियलने लिहिलंय की, ‘या आठवड्यात प्रशिक्षण पुन्हा सुरु करत आहे. या बॅटने खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करु शकत नाही’ तिने शेअर केलेल्या फोटोमधील बॅटवर कोहलीच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे असल्यामुळे नेटिझन्स तिला ट्रोल करत आहेत.

या फोटोमध्ये कोहलीचे स्पेलिंग Kholi असे लिहिले आहे. यावरुन एका नेटीझनने तिला खोलीचा अर्थ रुम असा होता, असे सांगत तिची ‘शाळा’ घेतली. तर आणखी एका नेटिझनने ‘लगान’ चित्रपटाचा दाखला देत कोहलीला भुवन तर डॅनियलला चित्रपटातील राणी एलिझाबेथची उपमा दिली. कोहलीच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिल्याने होणाऱ्या ट्रोलनंतर डॅनियलने ट्विटवरुन नेटिझन्सला प्रतिप्रश्न केलाय.

बॅट तयार करणाऱ्या कारागिराने कोहलीचे नाव लिहिले आहे. तुम्ही मला का ट्रोल करताय? असा प्रश्न तिने नेटीझन्सना विचारला. डॅनियलने इंग्लंडच्या महिला संघाकडून ३३ वन-डे आणि ५६ टी-२० सामने खेळले आहेत. २०१४ मध्ये डॅनियलने विराट कोहलीसोबत फोटो काढत, सोशल मीडियावर त्याला लग्नाची मागणी घातली होती. विराट आणि अनुष्काचं प्रेमप्रकरण सुरु असल्यामुळे डॅनियलची डाळ शिजली नाही, अशा प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अर्जुन तेंडुलकरकरसोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी देखील ती चर्चेत आली होती.

First Published on September 13, 2017 1:46 pm

Web Title: danielle wyatt trolled on twitter for kohli connection