News Flash

महाराष्ट्राची देविका घोरपडे सर्वोत्कृष्ट बॉक्सर

स्पर्धेत हरयाणा संघाने आठ सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व गाजविले.

भारतीय महिला बॉक्सर्स चमकल्या

सबज्युनिअर गटाच्या पहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. स्पर्धेत हरयाणा संघाने आठ सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व गाजविले.

हरयाणाच्या मुस्कान (३४ किलो), प्राची किन्हा (४० किलो),  प्राची कुमारी (४२ किलो), तमन्ना कुमार (४४ किलो), कुशी अवतार (५० किलो), आंचल सैनी (५२ किलो), प्रीति दहिया (५७ किलो), प्रांजल यादव (६३ किलो) यांना सुवर्णपदक मिळाले. मात्र, तामिळनाडूच्या एम.लोशिनी मंगेश हिने ३६ किलो गटात हरयाणाच्या निशासिंग हिला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले. मणीपूर संघाने दोन सुवर्णपदके जिंकली, तर उत्तराखंड व आंध्रप्रदेश यांनी प्रत्येकी एका गटात विजेतेपद पटकाविले. आंचल सैनी हिने ५२ किलो गटात दिल्लीच्या यामिनी तन्वर हिच्यावर शानदार विजय मिळविताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचे पारितोषिक पटकाविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:43 am

Web Title: devika ghorpade best boxer
Next Stories
1 भविष्यातील मेरी कोम स्थानिक स्पर्धांमधूनच घडतील – मुख्यमंत्री फडणवीस
2 सारा, आम्हाला तुझा अभिमान वाटतो – सचिन तेंडुलकर
3 खेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा – मुख्यमंत्री फडणवीस
Just Now!
X