एम. एस. धोनीने आपल्या आवडत्या खेळाला निरोप देतानाही त्याच्यातील वेगळेपणाची झलक दाखवली. ‘मै पल दो पल का शायर हूँ..’ या गाण्यावर आपल्या क्रिकेट कालखंडातील महत्त्वाच्या क्षणांचा वेध घेणारी ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर टाकत धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी सात वाजून २९ मिनिटांनी कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिला.

‘‘माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील लाभलेले तुमचे प्रेम आणि पाठींब्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. १९२९ पासून मी निवृत्त असेन,’’ अशी पोस्ट ‘इन्स्टाग्राम’वर टाकली. त्यानंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आले. धोनीने निवृत्तीसाठी हीच वेळ का निवडली यावर सोशल मीडियावर चर्चेला उधान आलं. धोनीने निवृत्तीसाठी १९२९ म्हणजेच सात वाजून २९ मिनिट ही वेळ का निवडली? असा प्रश्न चाहत्यांना पडला.. काय असा प्रश्न चाहत्यांना पडला… हा कोणता खास मुहूर्त होता का? तर नाही…

सोशल मीडियावर धोनीनं घेतलेल्या निवृत्तीच्या वेळेवर चर्चे सुरु आहे. काही चाहत्यांनी त्यासाठी लॉजिकही लावलं आहे. त्या लॉजिकचा विचार केला अन् धोनीचा स्वभाव आणि निर्णयक्षमता पाहिल्यास असे असू शकतं, असे प्रत्येकालाच वाटेल. २०१९ विश्वचषकातील उपांत्य सामन्यात खेळत असताना न्यूझीलंडच्या गप्टीलच्या अचूक फेकीवर धोनी धावबाद झाला होता. त्यानंतर भारताचा पराभव झाला अन् स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं.. हा सामना त्या दिवशी संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांच्या दरम्यानच सामना संपला होता. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ग्रॅन्ट एलिअटनं चहल बाद झाल्यानंतर भारत वर्ल्ड कपमधून बाद झाल्याचे ट्विट केले होते. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. कदाचीत विश्वचषकातील पराभवाच्या त्या दुर्देवी आठवणीला अखेरचा अलविदा करण्यासाठी धोनीने तीच वेळ निवडल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

निवृत्ती जाहीर करण्यासाठी धोनीने साधलेली वेळ आणि दिवस याबद्दल सोशल मीडियावर अशा एक ना अनेक चर्चा सुरु आहेत. पण सात वाजून २९ मिनीटं या वेळेमागचं नेमकं गणित काय असेल हे धोनीकडून कळेल असा चाहत्यांमध्ये विश्वास आहे.