News Flash

Video : शोएबचा विक्रम मोडला? युवा खेळाडूनं टाकला क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू

भारताविरूद्धच्या सामन्यात फेकला क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रविवारी क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये हा विक्रम झाला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना यानं १७५ किलोमीटर प्रती ताशी वेगानं एक चेंडू टाकला आहे. भारताचा सलामीचा फंलदाज जैयसवाल फलंदाजी करत होता.

श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथिराना याने खरंच क्रिकेट विश्वातील सर्वात वेगनान चेंडू टाकला का? असा प्रश्न ट्विटरवर नेटकरी विचारत आहेत. मात्र हा चेंडू खरोखरच विक्रमी वेगात टाकला की स्पीडमीटरमध्ये काही गडबड झाली, याबाबत अद्याप समजू शकले नाही. आयसीसीकडूनही या विक्रमावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

मथीशा पथिरानाने टाकलेला हा चेंडू लेग साइडने निघून गेला. पंचांनी हा चेंडू वाइड असल्याचा इशारा दिला. यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर जेव्हा बॉलचा स्पीड दाखवला तेव्हा सर्वच जण हैराण झाले. कारण चेंडू १७५ किलोमीटर प्रती ताशी वेगानं टाकल्याचं स्क्रीनवर झळकलं होतं.

क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएबने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या विरोधात विक्रमी १६१.३ किलोमीटर प्रती ताशी वेगाने चेंडू फेकला होता.

१९ वर्षाखालील विश्वचषकात भारताने सलामीच्या सामन्यात लंकादहन केलं.भारताने श्रीलंकेवर ९० धावांनी मात केली. भारताने विजयासाठी दिलेलं २९८ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही. श्रीलंकेचा संघ २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून अक्ष सिंह, सिद्धेश वीर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २-२ तर कार्तिक त्यागी-सुशांत मिश्रा-यशस्वी जैस्वालने १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 10:38 am

Web Title: did matheesha pathirana clock 175 kmph in u19 cricket world cup nck 90
Next Stories
1 गॉफचा व्हीनसवर पुन्हा धक्कादायक विजय!
2 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राचे  पदकांचे द्विशतक
3 राष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धा : मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबेरशहा शेख विजेता
Just Now!
X