News Flash

दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी होणार

अर्जेंटिनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात

अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अर्जेंटिना सरकारच्या न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झालेल्या मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. यामधून सावरल्यानंतर ते आपल्या घरी आले होते, तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या Buenos Aires येथील स्थानिक न्यायाधीशांनी मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भातल्या आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. “काही दिवसांपूर्वी आम्ही मॅराडोना यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे नातेवाईक व जवळीच लोकांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. मॅराडोना यांच्या घरातून जे काही पुरावे मिळाले त्या आधारावर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर लिओपोल्डो ल्युकी यांच्या घराची चौकशी करणं गरजेचं होतं.” अर्जेंटिनाच्या स्थानिक न्यायिक अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना माहिती दिली.

मॅराडोना यांचे वकील मातिआस मोरीया यांनी गुरुवारी मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. मॅराडोना यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्स बोलावण्यात आली होती, परंतू तिला पोहचायला अर्धा तास उशीर झाला. हा गुन्हा आहे. अशी माहिती मातिआस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 9:25 am

Web Title: diego maradona death to be investigated by argentine prosecutors psd 91
Next Stories
1 NZ vs WI : ग्लेन फिलीप्सचं झंजावाती शतक, विंडीजवर मात करत न्यूझीलंडने मालिका जिंकली
2 दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिकेतून बाहेर
3 SA vs ENG : इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, मालिकाही जिंकली
Just Now!
X