मुंबई इंडियन्स संघाचा सलामी फलंदाज ड्वेन स्मिथवर राजस्थान विरुद्ध झालेल्या दुस-या पात्रता फेरीत चुकीचे वर्तन केल्याबद्दल आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या नियमांनुसार १० टक्के दंड आकारण्यात आला आहे. सामन्याच्या तेराव्या षटकात राजस्थान रॉयल्स संघाचा डावखूरा गोलंदाज जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर आपली धाव पूर्ण करत असताना ड्वेन स्मिथने जेम्स फॉकनरशी वाद घातला होता. यावरुन सामन्याच्या पंचांनी ड्वेनला समज दिली होती.
ड्वेन स्मिथला आयपीएलच्या नियमांनुसार पहिल्या पातळीवरचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यानुसार, ड्वेन स्मिथच्या मानधनामधून १० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.