सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. करोना काळात १३ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही पहिलीच बॅडमिंटन स्पर्धा आहे. सायना, श्रीकांतपुढे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे.

डेन्मार्क स्पर्धेत सलामीला सायना आणि श्रीकांतसमोर खडतर आव्हान नाही. फ्रान्सच्या यॅले होयॉक्सविरुद्ध सायनाची लढत आहे. श्रीकांतची लढतही सलामीला इंग्लंडच्या टॉबी पेन्टीशी होईल. श्रीकांतलादेखील विजयी सलामी देण्याची संधी आहे. जर श्रीकांत जिंकला आणि अन्य लढतीतून भारताचा शुभांकर डे जिंकला तर ते दोघे दुसऱ्या फेरीत आमनेसामने येतील. टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याकरता सायना, श्रीकांतला क्रमवारीतील गुणांमध्ये वाढ करावी लागणार आहे.